
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दिवसापासून जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांनी 31 मार्चपर्यंत कंपनीचे 14.71 टक्के भाग भांडवल धारण केले होते. एसडी शिबुलाल यांनी या कंपनीचे 0.14 टक्के म्हणजेच 52,08,673 शेअर्स धारण केले आहे. तर त्यांच्या पत्नी कुमारी शिबुलाल यांनी इन्फोसिस कंपनीचे 0.13 टक्के म्हणजेच 49,45,935 शेअर्स धारण केले आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
इन्फोसिस लिमिटेड कंपनीचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ एसडी शिबुलाल यांच्या कुटुंबातील एका सदस्याने गुरुवारी आपले काही शेअर्स विकले आहेत. त्यामुळे गुरूवारी या कंपनीचे किंचित विक्रीच्या दबावात आले होते. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.64 टक्के घसरणीसह 1,444 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी इन्फोसिस स्टॉक 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह 1,446.65 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसा अखेर हा स्टॉक 1,439.50 रुपये किमतीवर आला होता. इन्फोसिस कंपनीच्या सह-संस्थापकांनी या कंपनीची तीन दशकांपेक्षा जास्त काळ सेवा केली आहे. इन्फोसिस कंपनीने जागतिक बाजारात देखील आपली उपस्थिती मजबूत केली आहे.
शिबुलाल यांचे पुत्र श्रेयस शिबुलाल यानी इन्फोसिस कंपनीचे 0.57 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर त्यांची सून भैरवी यांनी कंपनीचे 0.16 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्यांची मुलगी श्रुतीने या कंपनीचे 0.07 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर त्यांचे जावई गौरव मनचंदा यांनी इन्फोसिस कंपनीचे 0.34 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. शिबुलाल यांचा नातू मिलन शिबुलाल याने देखील कंपनीचे 0.18 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर शिबूलाल यांच्या कन्येची मुलगी निकिता शिबुलाल मनचंदाने इन्फोसिस कंपनीचे 0.18 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.