
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी IIFL फायनान्स, डॉ रेड्डीज लॅब्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि इन्फोसिस स्टॉकबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे.
तज्ञांच्या मते, या कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्हाला मालामाल करू शकतात.
IIFL फायनान्स :
जेफरीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 465 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के घसरणीसह 474.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
डॉ. रेड्डीज लॅब :
जेफरीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 5010 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 5,953.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एम अँड एम :
जेफरीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3510 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तर नोमुरा फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 3374 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के घसरणीसह 2,940.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इन्फोसिस :
जेफरीज जेफरीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1650 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तर CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 1553 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 1,501.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.