
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी 2 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजेच, मागील आठवड्यात कंपनीने 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 12,500 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट गमावला होता. याचा नकारात्मक परिणाम शेअर्सच्या किमतीवर पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.31 टक्के घसरणीसह 1,562.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इन्फोसिस कंपनीने शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी एका जागतिक कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराचे मूल्य 12.500 कोटी रुपये आहे. इन्फोसिस कंपनीने सेबीला या सामंजस्य कराराचा भंग केल्याची माहिती कळवली आणि गुंतवणूकारांनी स्टॉक विक्रीला सुरुवात केली.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही कंपन्यांमधील कराराची मुदत 15 वर्ष होती. जर इन्फोसिस कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला असता तर कंपनीला वार्षिक 800 कोटी रुपये महसूल मिळाला असता. इन्फोसिस कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते.
इन्फोसिस कंपनीने सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत 7.7 अब्ज डॉलर्सचे करार केले आहेत. त्यामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकवर कोणताही परिणाम झाला नाही. इन्फोसिस कंपनीने आयटी कंपन्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. पुढील आर्थिक वर्षात देशातील आयटी कंपन्यांचे मार्जिन, महसूल आणि ऑर्डर बुक मजबूत होण्याची शक्यता आहे. इन्फोसिस कंपनीने 2024 मध्ये आपल्या महसूल संकलनाच्या अंदाजात कपात केली आहे.
सध्या इन्फोसिस कंपनीचे शेअर्स आपल्या 20 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात इन्फोसिस कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्के वाढली आहे. तर मागील 6 महिन्यांत इन्फोसिस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत म्हणजेच YTD आधारे इन्फोसिस स्टॉक फक्त 2 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षांच्या दीर्घ कालावधीत इन्फोसिस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 134 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.