
Innovana Thinklabs Share Price | ‘इनोव्हाना थिंकलॅब्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल 5 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले आहेत. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला होता. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 580.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक या कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Innovana Thinklabs Share Price | Innovana Thinklabs Stock Price | NSE INNOVANA)
कंपनीची घोषणा :
स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहिती कंपनीने म्हंटले आहे की, “14 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोबतच ‘इनोव्हा थिंकलॅब्स लिमिटेड’ कंपनीने 15 मार्च 2023 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवली आहे.
‘इनोव्हा थिंकलॅब्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी NSE इंडेक्सवर टॉप गेनरमध्ये सामील होते. इनोव्हा थिंकलॅब्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स काल 526.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 115.69 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या स्टॉकने लोकांना 409.56 टक्के आणि गेल्या 5 वर्षात 501.59 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘इनोव्हा थिंकलॅब्स लिमिटेड’ ही कंपनी मुख्यतः सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात व्यापार करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.