
Inox Winds Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याच्या आहे. आज या लेखात आपण आयनॉक्स विंड्स कंपनीच्या शेअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आयनॉक्स विंड्स कंपनीच्या स्टॉकने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 64.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षात 350 टक्के परतावा दिला
मागील 3 वर्षात या मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयनॉक्स विंड्स लिमिटेड कंपनीला नुकताच मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी आयनॉक्स विंड्स कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 145.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीला नुकताच 3.3 मेगावॅट टर्बाइनची 100 मेगावॅटची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या बातमीनंतर आयनॉक्स विंड्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड्स कंपनीचे शेअर्स 146.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 7 जून रोजी आयनॉक्स विंड्स कंपनीचे शेअर्स 136 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 1 महिन्यात 25.83 टक्के परतावा दिला
मागील 5 दिवसांत आयनॉक्स विंड्स कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के मजबूत झाले आहेत. मागील 1 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 25.83 टक्के मजबूत झाले आहेत. आयनॉक्स विंड्स ही भारतातील आघाडीची पवन ऊर्जा कंपनी मानली जाते. आयनॉक्स विंड कंपनीला नुकतीच एक ऑर्डर मिळाली आहे, त्यासाठी कंपनीला इन्स्टॉलेशन आणि देखभालचे काम देण्यात आले आहेत.
INOX WINDS कंपनीच्या शेअर्सनी मागील 1 वर्षात आपल्या शेअर धारकांना 64.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर धारकांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जून महिन्यापर्यंत या कंपनीच्या शेअरने लोकांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 15 जुलै 2022 रोजी, आयनॉक्स विंड्स कंपनीचे शेअर्स 78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी, INOX कंपनीचे शेअर्स 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता 9 पट अधिक वाढले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.