27 July 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये 74 पैसे! तुटून पडले गुंतवणूदार या पेनी शेअरवर, फायदाच फायदा

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेन्शिया या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोठी गुंतवणुक केली आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.57 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. नुकताच इंटेग्रा एसेन्शिया कंपनीने राइट्स इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी इंटेग्रा एसेन्शिया स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 3.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंटेग्रा एसेन्शिया कंपनी अंश )

इंटेग्रा एसेन्शिया कंपनीच्या संचालक मंडळाने 3.25 रुपये किमतीवर राइट्स इश्यू जाहीर केला आहे. या कंपनीचा राईट इश्यू 11 जून तर 25 जून 2024 दरम्यान खुला असेल. या राईट इश्यूच्या माध्यमातून कंपनीने 49.93 कोटी रुपये भांडवल उभारणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. राइट्स इश्यूसाठी कंपनीने 1 जुलै 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. इंटिग्रा एसेंशिया कंपनीने आपल्या राईट इश्यूसाठी 119 शेअर्सवर 20 शेअर्स हा राइट्स इश्यू एंटाईलमेंट रेशो घोषित केला आहे.

इंटेग्रा एसेन्शिया कंपनीमध्ये LIC ने मोठी गुंतवणुक केली आहे. जानेवारी ते मार्च 2024 मधील शेअरहोल्डिंग डेटानुसार LIC कंपनीने इंटेग्रा एसेन्शिया कंपनीचे 97,19,832 शेअर्स म्हणजेच 1.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. राइट्स इश्यूमध्ये कंपन्या आपल्या शेअरहोल्डर्सना सवलतीवर नवीन शेअर्स खरेदी करण्याची संधी देतात. कंपन्या सवलतीच्या दरावर स्टॉकमध्ये एक्सपोजर वाढवण्यासाठी राईट इश्यू जाहीर करत असतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 11 June 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x