
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील या मायक्रो कॅप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. नुकताच इंटेग्रा एसेंशिया कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीच्या शेअरधारकांनी जीजी इंजीनियरिंग कंपनीसोबतच्या अमालगमेशनला मंजुरी दिली आहे. ( इंटेग्रा एसेंशिया कंपनी अंश )
मागील 1 वर्षात इंटेग्रा एसेंशिया कंपनीचा पेनी स्टॉक 2.95 रुपये किमतीवरून 30 टक्के वाढला आहे. 7 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 81 पैसे या नीचांक किंमत पातळीवरून 371 टक्के वाढले आहेत. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 1.84 टक्के वाढीसह 3.88 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या मजबूत व्यवसाय मॉडेलचा जीजी इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर धारकांना देखील फायदा होणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या प्रशासकीय परिचालन खर्चात घट झाल्यामुळे कंपन्यांची आर्थिक कामगिरी सुधारण्याची अपेक्षा आहे. तसेच या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीने जीजी इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरधारकांना प्रत्येक 100 शेअर्सवर 48 शेअर्स जारी करण्याचे निश्चित केले आहे. मार्च 2024 तिमाहीत एलआयसी कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 97.019 लाख म्हणजेच 1.06 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
मागील आठवड्यात शुक्रवारी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 3.81 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 407 कोटी रुपये आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.56 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.60 रुपये होती.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 3.4 रुपयेवरून वाढून 3.81 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2.95 रुपये या नीचांक किमतीवरून 30 टक्के परतावा दिला आहे. 7 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 81 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 371 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.