
IPO GMP | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा काळात गुंतवणुकदार IPO मध्ये गुंतवणूक करून आपले पैसे वाढवू शकतात. या आठवड्यात 5 कंपन्यांचे IPO बाजारात लाँच होणार आहेत. यामध्ये 4 SME IPO आणि एक मेनबोर्ड IPO चा समावेश आहे. मेनबोर्ड आयपीओमध्ये गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचा IPO असेल. यामधे विराट कोहली आणि अनुष्का शर्माने गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांनी IPO मध्ये आपले शेअर्स विकण्यास काढलेले नाही.
इंडियन इमल्सीफायर कंपनीचा IPO 13 मे ते 15 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा IPO 22 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. हा SME IPO आहे. मनदीप ऑटो इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओ देखील 13 मे ते 15 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
Veritas Advertising कंपनीचा SME IPO 13 ते 15 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा IPO स्टॉक 21 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. या तिन्ही कंपन्याच्या IPO चा आकार अनुक्रमे 8.48 कोटी रुपये, 25.25 कोटी रुपये, आणि 42.39 कोटी रुपये असेल. क्वेस्ट लॅबोरेटरी कंपनीचा IPO 15 मे ते 17 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
बेंगळुरूस्थित इन्शोरंस टेक स्टार्टअप गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचा IPO 15 मे ते 17 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 258-278 रुपये निश्चित केली आहे. या IPO मध्ये कंपनी 1,125 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. यात एकूण 54,766,392 शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी 14 मे रोजी IPO ओपन करण्यात आला होता. एका लॉटमध्ये कंपनीने 55 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.