
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ईग्झीगो कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ईग्झीगो या ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मचा IPO 10 जून ते 12 जून 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या शेअरची किंमत बँड 88-93 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे. या कंपनीने एका लॉटमध्ये 161 शेअर्स ठेवले आहेत. ( ईग्झीगो कंपनी अंश )
ईग्झीगो कंपनीने 7 जून रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO खुला केला होता. अँकर गुंतवणूकदारांकडून या कंपनीने 333 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 740 कोटी रुपये आहे. ईग्झीगो कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 120 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स आणि 620 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी करणार आहे.
ईग्झीगो ही कंपनी IPO च्या माध्यमातून जमा होणारी रक्कम भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तंत्रज्ञान तसेच डेटा सायन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी, अधिग्रहणाद्वारे वाढीसाठी आणि सामान्य ऑपरेटिंग उद्देशांवर खर्च करणार आहे. ईग्झीगो कंपनीने आपल्या IPO मध्ये बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून एक्सिस कॅपिटल लिमिटेड, डॅम कॅपिटल एडवाइजर्स लिमिटेड आणि जेएम फाइनेंशियल लिमिटेड यांना नियुक्त केले आहे. लिंक इनटाइम इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनीला या IPO चे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, ईग्झीगो स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 28 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर आपण ईग्झीगो कंपनीच्या IPO मधील अप्पर प्राइस बँडचा आणि ग्रे मार्केट प्रीमियमचा विचार केला तर, हा स्टॉक 121 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ही संभाव्य लिस्टिंग किंमत IPO किमतीच्या किमतीच्या तुलनेत 30.11 टक्केपेक्षा जास्त असू शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.