
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. ॲस्थेटिक इंजीनियरिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत. या कंपनीचा IPO 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. ( ॲस्थेटिक इंजीनियरिंग कंपनी अंश )
ॲस्थेटिक इंजीनियरिंग कंपनीचा IPO 26.47 कोटी रुपये किमतीचा बुक-बिल्ट इश्यू आहे. या IPO मध्ये 45.64 लाख फ्रेश शेअर्स इश्यू केले जाणार आहेत. यामधे ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतेही शेअर्स विकले जाणार नाहीत. ॲस्थेटिक इंजीनियरिंग कंपनीने आपल्या IPO मधे शेअर्सची प्राइस बँड प्रति शेअर 55 रुपये ते 58 रुपये दरम्यान निश्चित केली आहे.
नारनोलिया फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी या आयपीओसाठी व्यवस्थापन करणार आहे. तर स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निकुंज स्टॉक ब्रोकर्स या कंपनीला ॲस्थेटिक इंजीनियरिंग IPO साठी मार्केट मेकर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ग्रे मार्केटमध्ये ॲस्थेटिक इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 58 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक या किमतीवर टिकला तर शेअर लिस्टिंगच्या दिवशी 116 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 100 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. या स्टॉकची संभाव्य लिस्टिंग तारीख 16 ऑगस्ट आहे. ॲस्थेटिक इंजीनियरिंग ही कंपनी मुख्यतः दर्शनी प्रणाली डिझाइन, अभियांत्रिकी उत्पादन स्थापित करण्याचे काम करते.
ॲस्थेटिक इंजीनियरिंग कंपनी इमारतीचे दर्शनी भाग, अॅल्युमिनियमचे दरवाजे आणि खिडक्या, रेलिंग आणि पायऱ्या, ग्लासफायबर प्रबलित कॉक्रीट इत्यादीसह विविध सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. यासह ॲस्थेटिक इंजीनियरिंग कंपनी आदरातिथ्य, निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत प्रकल्प यासारख्या उद्योगांमध्ये ग्राहकांच्या विस्तृत सेवांची पूर्तता करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.