
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीच्या IPO बाबत माहिती देणार आहोत. ( एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनी अंश )
एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीचा IPO 3 जुलै 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. हा IPO 5 जुलैपर्यंत खुला असेल. या IPO चा आकार 1952.03 कोटी रुपये असेल. एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनी आपल्या IPO द्वारे 0.79 कोटी फ्रेश शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. यासह कंपनी 1.14 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकेल.
भारतात प्रसिध्द झालेली टीव्ही मालिका शार्क टँक इंडियामध्ये जज असलेल्या नमिता थापर या एमक्युअर फार्मास्युटिकल्स कंपनीच्या सीईओ आहेत. कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना 8 जुलै रोजी शेअर्स वाटप केले जातील. आणि 10 जुलै रोजी हा IPO स्टॉक BSE आणि NSE इंडेक्समध्ये सूचीबद्ध केला जाईल.
एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीच्या IPO शेअरची प्राइस बँड 960 ते 1008 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीने आपल्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 14 शेअर्स ठेवले आहे. किरकोळ गुंतवणुकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,112 रुपये जमा करावे लागतील. एमक्योर फार्मास्यूटिकल्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19029.89 कोटी रुपये आहे.
एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 90 रुपयेची सूट दिली आहे. ग्रे मार्केटमध्ये एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीच्या शेअरने खळबळ माजवली आहे. तज्ञांच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 264 रुपये प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीचे शेअर्स 26.19 टक्के प्रीमियम वाढीसह म्हणजेच 1272 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कंपनीने 35 टक्के वाटा राखीव ठेवला आहे. IPO पूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांकडे 98.90 टक्के भाग भांडवल होते. मागील एका आर्थिक वर्षात एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीने 527.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.