
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. जय कैलाश नमकीन कंपनीचा या स्मॉलकॅप कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. ( जय कैलाश नमकीन कंपनी अंश )
पहिल्याच दिवशी हा IPO पूर्णपणे सबस्क्राईब झाला आहे. जय कैलाश नमकीन कंपनीचा IPO 3 एप्रिल 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 50 टक्के प्रीमियम वाढीसह व्यवहार करत आहेत.
जय कैलाश नमकीन कंपनीच्या IPO चा आकार 11.93 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी 110 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. जय कैलाश नमकीन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 70 ते 73 रुपये निश्चित केली आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 38 रुपये प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत.
जर हा IPO स्टॉक 73 रुपये या आपल्या अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आला तर, जय कैलाश नमकीन कंपनीचे शेअर्स 111 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच, हा IPO स्टॉक गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 52 टक्के नफा कमावून देऊ शकतो. या कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप 4 एप्रिल 2024 रोजी केले जातील. तर 8 एप्रिल रोजी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.
जय कैलाश नमकीन कंपनीचा IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी 1.53 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1.87 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात कोटा 1.65 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 0.89 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
जय कैलाश नमकीन ही कंपनी IPO मधून जमा झालेली रक्कम आपल्या खेळत्या भांडवलासाठी खर्च करणार आहे. तसेच ही कंपनी आपल्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी काही रक्कम खर्च करणार आहे. या कंपनीची स्थापना 2021 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः पॅकेज केलेले भारतीय स्नॅक्स, चना नमकीन, चना मसाला, चना जोर नामकीन, पुदीना चना, मसाला मूंग, प्लेन मूंग, सोया स्टिक्स, चना डाळ यासारखे स्नॅक्स बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.