
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच जेएनके इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जेएनके इंडिया या हीटिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचा IPO 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( जेएनके इंडिया कंपनी अंश )
22 एप्रिल रोजी हा IPO अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. या कंपनीच्या IPO मध्ये 300 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स गुंतवणुकीसाठी जारी केले जातील. याशिवाय 84.21 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी जारी केले जाणार आहेत.
जेएनके इंडिया ही कंपनी आपल्या IPO मधून मिळणारे पैसे कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कामकाजाची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे. जेएनके इंडिया ही कंपनी तेल रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल प्लांट यांसारख्या प्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेवा प्रदान करते. या कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी थर्मॅक्स लिमिटेड ही कंपनी आहे.
जेएनके इंडिया ही कंपनी फ्लेअर्स, इन्सिनरेटर सिस्टीमचे उत्पादन करण्याचा देखील व्यवसाय करते. यासह ही कंपनी भविष्यात ग्रीन हायड्रोजनसह अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात देखील व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. मागील वर्षीच्या आर्थिक वर्षात जेएनके इंडिया कंपनीने 407.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
कंपनीच्या एकूण महसूल संकलनात तेल आणि वायू विभागाचा महसुलातील वाटा 77 टक्के आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 46.36 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीवर सध्या 56.73 कोटी रुपयेचे कर्ज आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.