 
						IPO GMP | नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओ शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. आयपीओद्वारे 13 कोटी रुपये उभे करण्याचा नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनीचा उद्देश आहे. नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनीने IPO साठी प्रति शेअर 20 ते 24 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे.
नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी गुंतवणूकदारांना 12 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार. नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 54.18 लाख शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
कंपनीकडून हा निधी कुठे वापरला जाणार?
नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी एम्ब्रॉयडरी मशीन खरेदी करण्यासाठी निधीतील 5.57 कोटी रुपये वापरणार आहे. तसेच, नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनीकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी 4 कोटी रुपयांचा वापर केला जाणार आहे. उर्वरित निधी नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनीच्या सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.
IPO लाॅट आकार
नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओमधील 50% शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 35% रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी किरकोळ गुंतवणूकदार किमान 6000 शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. म्हणजेच नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,44,000 रुपये गुंतवावे लागतील.
शेअर्सचे लिस्टिंग
गुंतवणूकदार 18 नोव्हेंबरपासून एनएसई इमर्जवर नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करू शकतील. एक्सपर्ट ग्लोबल कन्सल्टंट्स नीलम लिनन्स अँड गारमेंट्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी मर्चंट बँकर म्हणून काम करत आहेत. तर पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) IPO चे रजिस्ट्रार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		