 
						IPO GMP | साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओ’मध्ये 13 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 3,042.62 कोटींच्या साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 950.00 कोटी रुपयांचे 1.73 कोटी नवीन शेअर्स आणि 2,092.62 कोटी रुपयांचे 3.81 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर विक्रीसाठी असतील.
साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर प्राइस बँड
साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीने आयपीओ’साठी 522-549 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओसाठी गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 27 शेअर्स मिळतील.
साई लाइफ सायन्सेस कंपनीबद्दल
साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी औषधांचा रिसर्च, विकास आणि उत्पादन मूल्य शृंखला, स्मॉल मॉलिक्युल न्यू केमिकल एंटिटीज, जागतिक फार्मास्युटिकल इनोव्हेटर कंपन्या तसेच बायोटेक्नॉलॉजी कंपन्यासाठी एंड-टू-एंड सेवा पुरवते.
आयपीओचे रजिस्ट्रार
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, जेफरीज इंडिया आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी हे साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओ बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर केएफआयएन टेक्नॉलॉजीज साई लाइफ सायन्सेस आयपीओ’साठी रजिस्ट्रार आहेत.
ग्रे मार्केट प्रीमियम किती?
सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरचा जीएमपी सुमारे 31 रुपये आहे, जी आयपीओच्या किंमतीपेक्षा 6 टक्क्यांनी अधिक आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		