
IPO GMP | बायोडिझेल उत्पादक राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा आयपीओ NSE एसएमई सेगमेंटमधील आहे. या आयपीओ’साठी 26 नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. मात्र लाँच होण्यापूर्वीच हा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये चर्चेत आला आहे.
कंपनीची योजना काय?
राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत 24.70 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी 125 ते 130 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. हा आयपीओ 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान गुणतवणुकीसाठी खुला असेल.
कंपनी पैसे कुठे वापरणार
राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीला या आयपीओमार्फत उभारलेल्या निधीचा वापर त्यांच्या उपकंपनीला कर्ज देऊन विद्यमान उत्पादन संबंधित सुविधा वाढवण्यासाठी करणार आहे. याशिवाय राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे. तसेच कंपनीच्या इतर काही सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी देखील निधी वापरला जाईल.
शेअर्सचे वाटप
राजपुताना बायोडिझेल लिमिटेड आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35% शेअर्स राखीव असतील. या आयपीओ शेअर्सचे वाटप 29 नोव्हेंबरपर्यंत केले जाईल. तसेच राजपुताना बायोडिझेल लिमिटेड आयपीओ शेअर्स 3 डिसेंबरला एनएसईमध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
आयपीओ शेअर जीएमपी
काल, म्हणजे बुधवारी सकाळी 11 वाजता राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये 195 रुपयांवर ट्रेड करत होते. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओची वरची प्राईस बँड म्हणजे 130 रुपये किंमत मानली गेली, तर गुंतवणूकदारांना कमीतकमी 50 टक्के नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.