12 December 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

IPO Investment | IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, हे 3 IPO स्टॉक गुंतवणुकीसाठी लाँच करण्यात आले आहेत, डिटेल्स पहा

IPO Investment

IPO Investment | IPO मध्ये गुंतवणूक करून परतावा कमावण्याची इच्छा असलेल्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आली आहे. शेअर बाजारात 3 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी लाँच होणार आहे. त्यापैकी एक ‘मैनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ‘डी नीर्स टूल्स’ आणि ‘रेटिना पेंट’ या कंपन्यांचे IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुले केले जातील. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या IPO बद्दल सविस्तर माहिती.

1) Mankind Pharma Limited IPO :
प्रसिद्ध कंडोम बनवणाऱ्या या कंपनीचा IPO 25 एप्रिल 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 27 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला ठेवला जाईल. कंपनीने आपल्या IPO मध्ये 1026 रुपये ते 1080 रुपये प्रति शेअर किमत बँड ठरवली आहे. IPO अंतर्गत एका लॉटमध्ये 13 शेअर्स सामील असतील. यामुळे रिटेल गुतवणूकदाराना एका लॉटसाठी 14,040 रुपये जमा करावे लागतील. एक किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल 1,96,560 रुपये लावू शकतात. हा IPO BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर सूचिबद्ध केला जाईल. IPO मध्ये अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप 3 मे 2023 रोजी वाटप केले जाईल, आणि स्टॉक लिस्टिंग 8 मे 2023 रोजी केली जाईल.

2) डी नीर्स टूल्स :
या कंपनीचा IPO 28 एप्रिल 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. त्याच वेळी गुंतवणूकदार 3 मे 2023 पर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. या कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 95 रुपये ते 101 रुपये प्रति शेअर ठरवली आहे. कंपनी एका IPO लॉटमध्ये 1200 शेअर्स जारी करेल. यामुळे गुंतवणूकदाराला एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 121200 रुपये जमा करावे लागतील. या कंपनीचे शेअर्स 11 मे 2023 रोजी NSE SME इंडेक्समध्ये सूचीबद्ध केले जातील.

3) रेटिना पेंट्स :
या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे. या SME कंपनीचा IPO 19 एप्रिल 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि IPO ची अंतिम मुदत 24 एप्रिल 2023 रोजी संपली आहे. या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO Investment opportunity for earning huge Return on 25 April 2023.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x