 
						IPO Money Magic | 2021 या वर्षाच्या तुलनेत 2022 हे वर्ष IPO च्या दृष्टीने फारसे फायदेशीर ठरले नाही. परंतु ऑक्टोबर 2022 या महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात आयपीओ येण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. जेव्हा कोणीही गुंतवणूकदार नवीन कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक करतो, तेव्हा तो या गुंतवणुकीतून उच्च परतावा मिळेल अशी अपेक्षा करून पैसे लावतो. आज या लेखात आपण अशा एका IPO बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. आपण ज्या कंपनीच्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे,”फॅंटम डिजिटल इफेक्ट्स लिमिटेड”. या कंपनीचा आयपीओ ऑक्टोबर 2022 शेअर बाजारात खुला करण्यात आला होता. ही कंपनी 21 ऑक्टोबर 2022 रोजी NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाली होती. IPO लिस्टिंगच्या वेळी या कंपनीच्या शेअरने कमालीची वाढ नोंदवली होती.चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉकबद्दल सविस्तर
फॅंटम डिजिटल इफेक्ट्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 300 रुपये प्रति शेअर्स या किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. ज्या दिवशी कंपनीचा IPO लिस्ट झाला होता, त्यादिवशी शेअर्स 315 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर हा शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि स्टॉकवर विक्रीचा दबाव वाढू लागला. परिणामी कंपनीच्या शेअरची किंमत पडली आणि पहिल्याच दिवशी स्टॉक 312.70 रुपये प्रति शेअर या किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचा IPO ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्क्यांहून अधिक वाढले होते. कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 91 रुपये ते 95 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती.
IPO संबंधित महत्वाची माहिती :
या IPO चा aakar 29.10 कोटी रुपये होता. कंपनीने शेअर्सची प्राइस बँड 91 रुपये ते 95 रुपये दरम्यान निश्चित केली होती. या कंपनीने कमाल 1200 शेअर्सचा लॉट साइज निश्चित केला होता. म्हणजेच, या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 1.14 लाख रुपये जमा करावे लागले असतील. ज्या वेळी IPO ची लिस्टिंग झाली त्यावेळी या कंपनीचे शेअर्स 300 रुपये प्रति शेअर या किमतीवर सूचीबद्ध झाले होते. मात्र आता शेअरची किंमत 268 रुपयांपर्यंत पडली आहे. स्टॉक ची किंमत थोडीफार पडली असली तरी ज्यांना हे शेअर्स IPO मध्ये वाटप झाले होते, ते लोक अजूनही प्रॉफिटमध्ये आहेत. ज्या लोकांनी या IPO मध्ये 1.14 लाख रुपये गुंतवणूक कमाल स्टॉक असलेला लॉट घेतला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 3.35 लाख रुपये झाले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		