IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेजिंग – NSE: IRB

IRB Infra Share Price | सोमवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला (NSE: IRB) मिळाली होती. सोमवारी हा शेअर 7.79 टक्क्यांनी वाढला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी आयआरबी इन्फ्रा शेअर 7.79 टक्के वाढून 51.31 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिला आहे. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)

केंद्र आणि महाराष्ट्रात एनडीएचे सरकार असल्याने येत्या ५ वर्षात महामार्ग विकास, बुलेट ट्रेन आणि नवीन बंदरांसारख्या योजनांसाठी मोठा भांडवली खर्च केला जाऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सरकार एनडीएचे असल्याने त्यात प्रशासकीय अडथळे येणार नाहीत असं म्हटलं जातंय.

आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग

महाराष्ट्र राज्य महामार्ग प्रकल्पासाठी कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होईल, कारण महाराष्ट्र सरकार रस्ते बांधणीवर खर्च करत राहील. याचा फायदा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीला होईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 28,734 कोटी रुपये आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ५ दिवसात शेअरने 6.25% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा शेअरने 1.02% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 29.62% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 35.38% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा शेअरने 573.36% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 22.60% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 25 November 2024 Marathi News.