
IRB Infra Share Price | बीएसईवर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर घसरून 51.99 रुपयांवर बंद (NSE: IRB) झाला होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या महसुलात घट झाल्याची माहिती येताच शेअरच्या किंमतीत घसरण झाली. (आयआरबी लिमिटेड कंपनी अंश)
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ४ टक्क्यांनी वाढून ९९.८६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीला ९५.७४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न १,८७४.५० कोटी रुपयांवरून घटून १,७५१.१६ कोटी रुपयांवर आले आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की दुसऱ्या तिमाहीत त्याचे टोल संकलन 25% वाढले.
सेंट्रम ब्रोकिंग फर्म – ‘BUY’ रेटिंग
सेंट्रम ब्रोकिंग फर्मने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या मते आयआरबी इन्फ्रा शेअर 35% पर्यंत परतावा देऊ शकतो. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी 72 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक 38400 कोटी रुपये आहे. तसेच वित्तीय वर्ष 25 च्या अखेरीस 20,000-25,000 कोटी रुपयांच्या नवीन कॉन्ट्रॅक्टचे टार्गेट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – ‘Add’ रेटिंग
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सांगितले की , ‘लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून आयआरबी इन्फ्रा कंपनीला दोन लाख कोटी रुपयांच्या बीओटी (BOT) प्रकल्पांसाठी PPP मोडअंतर्गत संधी मिळण्याची अपेक्षा आहे. आयआरबी इन्फ्रा कंपनीने दुसऱ्या तिमाहीत नवीन कॉन्ट्रॅक्टबाबत सुधारलेला दृष्टीकोन आणि संभाव्य चांगल्या टोल वाढीच्या पार्श्वभूमीवर एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी ६९ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने IRB इन्फ्रा शेअरला ‘Add’ रेटिंग दिली आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 25.41% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 55.19% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 559.77% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 24.23% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.