 
						IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 30 मे रोजी शेअर बाजार उघडताच आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये मोठी ब्लॉक डील पाहायला मिळाली होती. त्यानंतर हा स्टॉक 13 टक्के घसरला होता. या ब्लॉक डीलमध्ये एकूण 32.85 कोटी शेअर्स 65 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड झाले होते. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 5.4 टक्के आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
या ब्लॉक डीलचे एकूण मूल्य 2,033 कोटी रुपये होते. या ब्लॉक डीलचे मुख्य ब्रोकर जेफरीज आणि सीएलएसए इंडिया हे होते. या ब्लॉक डीलमुळे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक एका दिवसात 13 टक्के घसरला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 9.28 टक्क्यांच्या घसरणीसह 65.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.15 टक्के वाढीसह 65.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 58 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मार्च 2024 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 33.2 टक्के भाग भांडवल आयआरबी होल्डिंग्स लिमिटेड कंपनीने धारण केले आहे. तर दीपाली वीरेंद्र म्हाईस्कर यांनी कंपनीचे 0.27 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
मार्च 2024 तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 45.1 टक्क्यांच्या वाढीसह 188.9 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 130.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 27.2 टक्के वाढीसह 2,061.2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1,620 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2024 तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा ऑपरेटिंग नफा म्हणजेच EBITDA 17.3 टक्क्यांच्या वाढीसह 889.9 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		