15 February 2025 2:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी, रु.18000 सॅलरी असणाऱ्यांच्या खात्यात 1,30,35,058 रुपये जमा होणार Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल Horoscope Today | शनिवार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य, मेष आणि तुळ सह या राशींसाठी शनिवारचा दिवस शुभ राहील Shukra Rashi Parivartan | शुक्र अस्त आणि उदय होणार, या 3 नशीबवान राशींच्या नशिबाचा उदय होणार, तुमची राशी कोणती New Income Tax Bill | सावधान, नवीन इन्कम टॅक्स बिलचा थेट तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर परिणाम होणार, अपडेट लक्षात ठेवा UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या
x

IPO Investment | दोन सरकारी कंपन्यांचे IPO लवकरच बाजारात लाँच होणार, कंपनी आणि IPO डिटेल्स पहा

IPO Investment

IPO Investment | भारत सरकार अनेक सरकारी कंपन्याचे निर्गुंतवणुकीकरण करण्याच्या उद्देशाने पाऊल पुढे टाकत चालली आहे. आधी सरकारने LIC चा IPO आणला, जो फ्लॉप गेला. आणि आता भारत सरकार ‘IREDA’ आणि सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी सल्लागार कंपनी ‘वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपन्याचे IPO आणण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव ‘तुहिन कांत पांडे’ यांनी जाहीर निवेदनात ही माहिती दिली. या दोन्ही कंपन्यांचे IPO पुढील आर्थिक वर्षात बाजारात येऊ शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IREDA Share Price | IREDA Stock Price | WAPCOS Share Price | WAPCOS Stock Price)

केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव ‘तुहिन कांत पांडे’ यांनी पीटीआयला माहिती दिली की, या दोन्ही कंपन्यांच्या IPO च्या माध्यमातून सरकारने 51,000 कोटी रुपयांचे निर्गुतवणुकीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आयआरईडीए कंपनीच्या IPO पुढील आर्थिक वर्षात गुंतवणुकीसाठी लाँच केला जाऊ शकतो. तर WAPCOS कंपनीच्या IPO साठी मसुदा कागदपत्रे जमा करण्यात आले आहेत. DIPAM विभाग PSU कंपन्यांमधील सरकारच्या इक्विटी स्टेकचे व्यवस्थापन करण्याचे काम करते.

जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी सल्लागार आणि बांधकाम सेवा प्रदान करणाऱ्या WAPCOS कंपनीच्या IPO साठी सरकारने मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये 3.25 कोटी शेअर्स विक्रीसाठी सेबीला कागदपत्रे सादर केली आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीने 2,798 कोटी रुपये ऑपरेटिंग महसूल उत्पन्न संकलित केला होता. तर त्यातून कंपनीने 69.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी’ या कंपनीच्या IPO लाँच करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने 2017 मध्ये मंजूर केला होता. IREDA कंपनीच्या IPO अंतर्गत भारत सरकार 13.90 कोटी फ्रेश शेअर्स जारी करण्याची योजना आखत आहे. मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये केंद्रीय कॅबिनेटने IREDA कंपनीची कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी 1,500 कोटी रुपयांची अतिरीक्त इक्विटी गुंतवणुक केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA IPO and WAPCOS IPO will be launch soon check details on 06 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x