 
						IREDA Share Price | मागील काही दिवसांपासून इरेडा लिमिटेड कंपनी शेअर मजबूत (NSE: IREDA) तेजीत आहे. गुरुवारी इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली होती, तर शुक्रवारी 1.54% घसरून 205.20 रुपयांवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. सलग पाचव्या दिवशी इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. इरेडा कंपनी शेअर्सबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
इरेडा शेअर 5 दिवस तेजीत
शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 1.54 टक्के घसरून 205.20 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, इरेडा शेअरचा दिवसभरातील उच्चांक 210.70 रुपये होता. त्याआधी गुरुवारी बीएसईवर इरेडा शेअर ८ टक्क्यांपर्यंत वधारला होता. गेल्या 5 दिवसांमध्ये इरेडा कंपनी शेअरमध्ये 5.20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
इरेडा शेअरबाबत तज्ज्ञांचे मत काय?
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इरेडा लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इरेडा लिमिटेड कंपनी शेअरसाठी २८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. दुसरीकडे, फिलिप कॅप्टिल ब्रोकरेज फर्मने इरेडा लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. फिलिप कॅप्टिल ब्रोकरेज फर्मने इरेडा लिमिटेड कंपनी शेअरसाठी 130 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
शेअरची सध्याची स्थिती
मागील काही महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार असूनही २०२४ मध्ये इरेडा लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये ९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मागील ३ महिन्यात इरेडा शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील ३ महिन्यात इरेडा कंपनीचा शेअर १८.४७ टक्क्यांनी घसरला आहे. इरेडा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 310 रुपये होता आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 50 रुपये होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		