
IREDA Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी दिवसभराच्या चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. एनएसई निफ्टी 100 अंकांनी घसरून 23200 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची घसरण होऊन ७६६०० वर बंद झाला होता. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरसाठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सकारात्मक संकेतांसह टार्गेट प्राईस देखील दिली आहे.
इरेडा कंपनी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअर 1.28 टक्क्यांनी वाढून 206.80 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर इरेडा कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 114.30 रुपये होता. इरेडा कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 55,647 कोटी रुपये आहे.
इरेडा शेअरबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले
जागतिक पातळीवर नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राबाबत सकारात्मक संकेत दिसत आहेत. याचा थेट फायदा अक्षय ऊर्जेशी संबंधित सर्व कंपन्यांना होईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी इरेडा शेअरबाबत खरेदीचा सल्ला दिला आहे. मात्र गुंतवणूकदारांना १८० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना मध्यम ते लॉन्ग टर्ममध्ये इरेडा शेअर फायद्याचा ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
स्टॉक मार्केट विश्लेषकांनी इरेडा शेअरसाठी २४० रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. माध्यम कालावधीत २४० रुपयांची पातळी ओलांडताच वर्षभरात शेअर ३०० रुपयेपर्यंत वाढू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यासाठी एक वर्ष ते दीड वर्षात कालावधी लागू शकतो. त्यानंतर लॉन्ग टर्ममध्ये इरेडा शेअर ४२५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
इरेडा कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअर 1.17% घसरला आहे. मागील १ महिन्यात इरेडा कंपनी शेअर 2.69% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 19.66% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 66.51% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 229.56% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर इरेडा कंपनी शेअर 6.75% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.