
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांकडून चालू आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. काही कंपन्यांसाठी तिसऱ्या तिमाहीचे निकाल नकारात्मक राहिले आहेत. तर काही कंपन्यांनी चालू आर्थिक तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे.
इरेडा शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी इरेडा कंपनी शेअर 3.83 टक्क्यांनी घसरून 187.42 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 121.05 रुपये होता. या तेजीनंतर इरेडा कंपनीचे एकूण मार्केट कॅप 50,490 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्म – स्टॉक रेटिंग
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने डिसेंबर तिमाहीचे दमदार निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, इरेडा कंपनी शेअर सुद्धा गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो असे संकेत दिले आहे.
इरेडा शेअर टार्गेट प्राईस
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इरेडा कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इरेडा कंपनीने मजबूत नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इरेडा कंपनीचा नफा ४२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेजने इरेडा कंपनी शेअरसाठी २५० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजे हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा २८ टक्क्यांनी अधिक परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.