
IREDA Share Price | IREDA या सरकारी कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. 11 डिसेंबर 2023 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. IREDA कंपनीचे शेअर्स आपल्या IPO च्या अप्पर प्राइस बँडपेक्षा 166 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. IREDA कंपनीचा IPO 21 ते 23 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
29 नोव्हेंबर 2023 रोजी IREDA स्टॉक 60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. IREDA कंपनीने नुकताच PM-KUSUM योजना, रूफटॉप सोलर आणि इतर B2C क्षेत्रांतर्गत कर्ज पुरवठा योजना सुरू केली आहे. त्यामुळे IREDA स्टॉक शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी IREDA स्टॉक 20.00 टक्के वाढीसह 102.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
रिटेल क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेचच कुसुम-बी योजने अंतर्गत IREDA कंपनीने 58 कोटी रुपये कर्जाच्या रक्कमेला तात्काळ मंजूरी दिली होती. 11 डिसेंबर 2023 रोजी IREDA कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 74.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती.
आज देखील हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 100 रुपयेच्या पार गेला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक सल्लागारांच्या मते, IREDA कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. तथापि काही गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये नफा वसुली करू शकतात. काही गुंतवणूकदार सल्लागारांना अपेक्षा आहे की, या कंपनीचे शेअर्स दीर्घ काळात गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवू शकतात.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, IREDA कंपनीला ग्रीन हायड्रोजन, पंप केलेले हायड्रो स्टोरेज पॉवर प्लांट्स, बॅटरी स्टोरेज व्हॅल्यू चेन, ग्रीन एनर्जी कॉरिडॉर यासारख्या हरित तंत्रज्ञानामधील वैविध्य आणि विस्तारामुळे कंपनीच्या कर्ज वाटपात वाढ होऊ शकते. IREDA कंपनीला आर्थिक क्षेत्रात व्यवसाय करण्याचा 36 वर्षाचा अनुभव आहे.
कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांना वित्तीय सहाय्य पुरवण्याचे काम करते. IREDA कंपनी आपल्या ग्राहकांना प्रकल्प नियोजन आणि पोस्ट कमिशनिंग यासारख्या सर्व आर्थिक सेवा प्रदान करण्याचे काम करते. IREDA कंपनीने आर्थिक वर्ष 2021-23 दरम्यान 58 टक्के CAGR निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.