
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने अद्भुत तेजी नोंदवली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 194 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक तब्बल 30 टक्के मजबूत झाला आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 11.43 टक्क्यांच्या वाढीसह 176.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 214.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या विक्रमी उच्चांक किंमतीवरून हा स्टॉक 17.93 टक्क्यांनी कमी किमतीवर ट्रेड करत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आयआरईडीए कंपनीने आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 37,354 कोटी रुपये मूल्याचे कर्ज वाटप केले आहे.
मागील वर्षी आयआरईडीए कंपनीच्या कर्ज बुकचा एकूण आकार 59,650 कोटी रुपये होता. ज्यात आता 26.71 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने वार्षिक आधारावर 101.71 टक्के वाढीसह 23,796 कोटी कर्ज मंजूर केले होते.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक अल्पावधीत 185 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 170 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक 215 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
आयआरईडीए स्टॉकमध्ये 155 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 168 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 199 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक पुढील एका महिन्यासाठी 160 रुपये ते 200 रुपये दरम्यान ट्रेड करेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.