
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमधील काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्येच मल्टिबॅगर परतावा (SGX Nifty) दिला आहे. पीएसयू इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्ह एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर देखील गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा (Gift Nifty Live) ठरला आहे. शेअर बाजारात पदार्पण झाल्यापासून गुंतवणूकदारांची कमी कालावधीत मोठी कमाई झाली आहे. आता आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत दिले आहेत. (इरेडा कंपनी अंश)
IREDA शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअरने शॉर्ट टर्म मध्येच गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध झाल्यापासून इरेडा शेअरमध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले तरी गुंतवणूदारांना मल्टिबॅगर परतावा मिळाला आहे. मागील सलग ५ दिवस IREDA शेअर तेजीत होता. मागील ५ दिवसात शेअर्समध्ये १५% वाढ झाली आहे.
IREDA शेअरने मल्टीबॅगर परतावा दिला
शेअर बाजारात प्रवेश करून केवळ १ वर्ष झालेल्या इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना २४४ टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. केवळ १ वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. आता या सरकारी कंपनीच्या शेअरबाबत आनंद राठी ब्रोकरेज फर्मने सकारात्मक संकेत दिले आहेत.
IREDA शेअरसाठी ब्रोकरेजचे टार्गेट
आनंद राठी ब्रोकरेज फर्मने IREDA कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने IREDA कंपनी शेअर २०५ ते २१४ रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने IREDA कंपनी शेअरसाठी २६५ रुपये टार्गेट प्राईस सह १८० रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनी शेअरची आयपीओ प्राईस बँड ३० ते ३२ रुपये होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.