2 May 2025 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. इरेडा शेअर संदर्भात सध्या ‘वेट अँड वॉच’ करण्याचा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे.

इरेडा शेअर टार्गेट प्राईस

गुंतवणूकदारांनी तूर्तास केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहावी, कारण त्यानंतर इरेडा शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ठोस निर्णय घेता येईल. अर्थसंकल्पामध्ये या क्षेत्रातील कंपन्यांना केंद्र सरकारकडून सकारात्मक संकेत मिळू शकतात. त्याचा फायदा इरेडा कंपनीच्या शेअरला सुद्धा होऊ शकतो. येत्या काही दिवसांत इरेडा शेअर २८० आणि ३०० रुपयांच्या टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो असं विश्लेषकांनी म्हटलं आहे. सध्या इरेडा कंपनी शेअर 194 रुपयांवर ट्रेड करत आहे.

तसेच स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी खालच्या पातळीवर म्हणजे १८० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉपलॉस थोडा मोठा असला तरी काळजी करण्याचे कारण नाही असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. इथून इरेडा शेअर रिव्हर्स झाला तर तो २८० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

इरेडा क्यूआयपी निधी संकलन

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत क्यूआयपीच्या द्वारे ५,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. क्यूआयपीमधील ७५ टक्के हिस्सेदारीपैकी केंद्र सरकारचा हिस्सा ७ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशी अपडेट कंपनीकडून देण्यात आली आहे.

इरेडा तिमाही निकाल आर्थिक वर्ष 2025

डिसेंबर तिमाहीत इरेडा कंपनीचा निव्वळ नफा 27 टक्क्यांनी वाढून 425.38 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण ऑपरेटिंग महसूल 35.6 टक्क्यांनी वाढून 1,698.45 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत 1,252.85 कोटी रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Sunday 26 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या