
IREDA Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी पीएसयू इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मजबूत तेजी आली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर बुधवारी तुफान तेजीत होता. डिसेंबर २०२४ तिमाही संबंधित बिझनेस अपडेटनंतर इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे.
इरेडा शेअरची सध्याची स्थिती
बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी इरेडा लिमिटेड कंपनी शेअर 4.65 टक्क्यांनी वाढून 225.25 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर इरेडा लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 100.20 रुपये होता. इरेडा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 60,448 कोटी रुपये आहे.
इरेडा कंपनीबाबत अपडेट
इरेडा कंपनीबाबतच्या डिसेंबर 2024 तिमाही बिझनेस अपडेटनुसार, ‘इरेडा कंपनीने मंजूर केलेले कर्ज वार्षिक आधारावर 129 टक्क्यांनी वाढून 31,087 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत इरेडा लिमिटेड कंपनीने १३,५५८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत इरेडा कंपनीच्या कर्जाचे वितरण ४१ टक्क्यांनी वाढून १७,२३६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तसेच डिसेंबर 2024 पर्यंत इरेडा कंपनीच्या थकित कर्जाची रक्कम 69000 कोटी रुपये होती.
इरेडा कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात इरेडा कंपनी शेअरने 10.92% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 10.23% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात इरेडा कंपनी शेअरने 14.64% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 114.83% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात इरेडा कंपनी शेअरने 86.88% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 0.52% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.