
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2.6 टक्के वाढीसह 189.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक जबरदस्त घसरला आहे. नुकताच या कंपनीने आपले एप्रिल-जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर शेअरच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली होती. जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 6,765 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 6,673 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 1.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीचा निव्वळ नफा 1,576 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,551 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न, किंवा मूळ उत्पन्न 1.8 टक्क्यांनी वाढून 1,611 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.77 टक्के घसरणीसह 178.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने आठ नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.46 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सचा PE सध्या 37.52 पट आहे. तर EPS 4.92 रुपये प्रति शेअर आहे.
मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 267.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून संयम राखला होता, हे लोक आता मालामाल झाले आहेत. आयआरएफसी ही सरकारी कंपनी रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे बहुतांश शेअर्स भारत सरकारने धारण केले आहे. भारतीय रेल्वेच्या ‘अतिरिक्त बजेटरी रिसोर्सेस’ गरजा पूर्ण करणे हे आयआरएफसी कंपनीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.