
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 3.5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. मागील तीन वर्षांत अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे, जेव्हा आयआरएफसी स्टॉक सलग नऊ दिवस लाल रंगात क्लोज झाला होता. या विक्रीच्या दबावातून हा स्टॉक आज बाहेर आला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
या कंपनीचे शेअर्स आज आपल्या 50 दिवसांच्या सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजच्या जवळ पोहोचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.32 टक्के वाढीसह 184.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयआरएफसी स्टॉक 15 जुलै रोजी 229 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. मात्र त्यानंतर हा स्टॉक 17 टक्के घसरला आहे. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ओव्हरबॉट झोनमधून घसरून 48 वर आला आहे. जुलै महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्के वाढली होती. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 84.59 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 438.17 टक्के नफा कमावून दिला आहे.
जून तिमाहीपर्यंत 5.79 लाख किरकोळ शेअरधारकांनी आयआरएफसी स्टॉक होल्ड केला होता. मात्र आता या कंपनीच्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या 50.63 लाख झाली आहे. मार्च तिमाहीच्या अखेरीस ही संख्या 44.84 लाख होती. देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीमधील हिस्सेदारी 0.18 टक्केवरून 0.55 टक्केवर नेली आहे. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 1.11 टक्के भागभांडवल धारण केले आहे. जून तिमाहीच्या शेवटी भारत सरकारने या कंपनीचे 86.36 टक्के भागभांडवल धारण केले होते. सरकारला पुढील काळात किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग नियमांनुसार कंपनीतील 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा विकावे लागेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.