
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या 3.01 कोटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील एका आठवड्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला होता.
ट्रेडिंग स्टॉक व्हॉल्यूमच्या बाबतीत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी किंवा विक्री केले जात होते. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीची स्टॉक व्हॉल्यूम 9.05 कोटी होती. यासह व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम 5.83 कोटी नोंदवली गेली होती. आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 5.66 टक्के वाढीसह 47.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवारी विविध कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम खालीलप्रमाणे :
रिलायन्स पॉवर : 5.26 कोटी
जेपी पॉवर : 4.04 कोटी
इंडियन रेल्वे फिन : 3.01 कोटी
रतनइंडिया पॉवर : 3.01 कोटी
हिंद कॉन्स्ट कंपनी : 1.71 कोटी
विसागर फिन : 1.69 कोटी
झोमॅटो : 1.41 कोटी
येस बँक : 1.18 कोटी
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 44.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील आठवड्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 दिवसांत IRFC कंपनीच्या शेअरची किंमत 26 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 34 टक्के मजबूत झाला आहे. मागील सहा महिन्यांत IRFC कंपनीच्या शेअरची किंमत 30.20 रुपयेवरून वाढून 44.95 रुपयेवर पोहचली आहे. याकाळात IRFC स्टॉकने लोकांना 48.84 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षभरात IRFC कंपनीच्या शेअर धारकांचे पैसे दोन पट वाढले आहेत. म्हणजेच मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 111.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीतील लेटेस्ट शेअर होल्डिंग डेटानुसार प्रवर्तकांनी IRFC कंपनीचे 86.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी आपला वाटा 1.15 टक्क्यांवरून कमी करून 1.14 टक्क्यांवर आणला आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी देखील आपला गुंतवणूक वाटा 2.62 टक्क्यांवरून कमी करून 2.02 टक्केवर आणला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.