
IRFC Vs RailTel Share Price | सध्या रेल्वे सेवा संबंधित IRFC, RVNL आणि RailTel कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत आहेत. दरम्यान, रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कंपनीला मोठी ऑर्डर देताच शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावू लागले. मिनीरत्न दर्जा असलेल्या रेलटेल कॉर्पोरेशन या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने एका दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला 120 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर दिली आहे. त्यानंतर हा स्टॉक तेजीत आला. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 14.67 टक्के वाढीसह 336.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रेलटेल कॉर्पोरेशन या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीने सेबीला कळवले आहे की, रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला सिग्नलिंग आणि दूरसंचार कामां संबंधित मोठ्या प्रमाणात स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीमच्या तरतूदीसाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 120.45 कोटी रुपये आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला 2 वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 138 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची किंमत 130 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 293.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 19 डिसेंबर 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 320.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
रेलटेल कॉर्पोरेशन ही एक भारतीय सरकारी क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतीय रेल्वेला ब्रॉडबँड आणि VPN सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना सप्टेंबर 2000 साली देशव्यापी ब्रॉडबँड, दूरसंचार आणि मल्टीमीडिया नेटवर्क तयार करणे आणि भारतीय रेल्वेच्या ट्रेन नियंत्रण ऑपरेशन्स आणि सुरक्षा प्रणालींचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी सरकारी कंपनी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.