
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 248.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दोन मोठ्या ऑर्डर मिळाल्यामुळे स्टॉक तेजीत आला होता. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
रेल विकास निगम कंपनीला सालासर कंपनीच्या सोबतच्या संयुक्त उपक्रमाला मध्य प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कंपनीने 132kV आणि 220kV ट्रान्समिशन लाइनसाठी एलओआय जारी केले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 173.98 कोटी रुपये असेल. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 4.48 टक्के घसरणीसह 232.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच रेल विकास निगम कंपनीला एमपी वेस्ट झोन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड कंपनीने 106.37 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. मागील 4 वर्षांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1800 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 14 मार्च 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 248.05 रुपये किमतीवर पोहचला होता.
मागील 3 वर्षांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 685 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 31.30 रुपयेवरून वाढून 248.05 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 60.30 रुपये होती.
आरव्हीएनएल कंपनीला राजस्थान स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 193 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. तर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीने देखील आरव्हीएनएल कंपनीला 339.23 कोटी रुपये मुल्याची ऑर्डर दिली होती. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने आरव्हीएनएल कंपनीला 47.36 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती.
हा प्रकल्प नागपूर विभागातील खापरी-सेवाग्राम विभागात सिग्नलिंग आणि दूरसंचार कामांची पूर्तता करण्यासाठी देण्यात आला होता. आरव्हीएनएल आणि URC यांच्या संयुक्त उपक्रमाला मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीने 543 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. तर हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाने देखील कंपनीला 409.65 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर मिळाली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.