12 May 2025 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार; पुढे मिळणार जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार; मल्टिबॅगर शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC IREDA Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत, खरेदी करून ठेवा हा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी स्टॉक खरेदीला गर्दी, BUY रेटिंग जाहीर, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Vikas Lifecare Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलवर आला, पुढे काय होणार? अपडेट आली - NSE: VIKASLIFE Rattanindia Enterprises Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकस मध्ये; यापूर्वी दिला 2456% परतावा - NSE: RTNINDIA SJVN Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 44 टक्के रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SJVN
x

IRFC Vs RVNL Share Price | सरकारी शेअर्स पुन्हा तेजीत येणार, कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, किती फायदा होईल?

IRFC Vs RVNL Share Price

IRFC Vs RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना अल्पावधीत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. 9 मार्च रोजी आरव्हीएनएल कंपनीने सेबीला कळवले की, त्यांना मध्यप्रदेश मेट्रोरेल कॉर्पोरेशनने 543 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

ही बातमी जाहीर झाल्यावर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक एका दिवसात 5.48 टक्क्यांच्या वाढीसह 251.05 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.28 टक्के घसरणीसह 242.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने 257.55 रुपये ही इंट्रा डे उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स किंचित नफा वसुलीला बळी पडले आहेत. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 60.30 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52,156.78 कोटी रुपये आहे.

रेल विकास निगम कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांना मध्य प्रदेश मेट्रोरेल कॉर्पोरेशनकडून एलिव्हेटेड इलेक्ट्रिकल पार्ट्सचे डिझाइन आणि बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 1092 दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

मागील 1 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 10.7 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल स्टॉक 63.1 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापासून हा स्टॉक होल्ड केला आहे, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 283.70 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share Price NSE Live 12 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या