
IRFC Vs RVNL Share | भारतीय रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. मात्र आता हे शेअर्स विक्रीच्या दबावात अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून IRFC Limited, RVNL, IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या सारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू आहे. त्यामुळे रेल्वे कंपन्याच्या शेअर्सची कामगिरी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला होता.
आयआरएफसी लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.78 टक्के घसरणीसह 136.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 192 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 35 टक्के कमजोर झाले आहेत. भारत सरकारने या कंपनीचे 86 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे.
आरव्हीएनएल :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर नुकताच या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे स्टॉक तेजीत आला होता. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के वाढीसह 246.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
RailTel कंपनी :
RailTel कंपनीच्या शेअर्समध्ये देखील काही खास तेजी पाहायला मिळाली नाहीये. दरम्यान IRFC स्टॉकमध्ये 35 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. RailTel स्टॉकमध्ये 38 टक्के, IRCON स्टॉकमध्ये 33 टक्के, आणि RVNL स्टॉकमध्ये 36 टक्के, तर IRCTC स्टॉकमध्ये 17 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये विविध प्रकारची विकासात्मक कामे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे शेअर्स सध्या विक्रीच्या दबावात असेल तरी दीर्घकाळात चांगली कमाई करून देऊ शकतात यात शंका नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.