
IRFC Vs Titagarh Rail Share | मागील काही महिन्यांपासून टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1046 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉक 2.43 टक्के घसरणीसह 975.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी टिटागड रेल सिस्टीम्स स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 485 टक्के वाढले आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही एक वर्षापूर्वी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.85 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12 लाख रुपये झाले असते.
टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीने स्वीडिश-स्विस बहुराष्ट्रीय कंपनी ABB सोबत धोरणात्मक भागीदारी करार केला आहे. या भागीदारी अंतर्गत, या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे मेट्रो रेल्वेसाठी प्रोपल्शन प्रणाली तयार करण्याचे काम करणार आहे.
टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी ट्रेनचे डब्बे बनवणारी मुख्य कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः रोलिंग स्टॉकचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा, कमिशनिंग आणि सर्व्हिसिंगसाठी सुविधा प्रदान करण्याचे काम करते. टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी सोबतच्या कराराने एबीबी कंपनीचे शेअर्स देखील तेजीत वाढत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.