
IRFC Vs Titagarh Rail Share | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी या कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळाली, आणि शेअर 4 टक्के वाढीसह 785 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 866.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स 4.58 टक्के वाढीसह 785.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ब्रोकरेज फर्मचे मत
ब्रोकरेज फर्म एचएसबीसीच्या तज्ञांनी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक पुढील काळात 900 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 15 टक्के परतावा देऊ शकतो.
मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आणि कंपनीचे मूलभूत तत्वे मजबूत असल्याने शेअर बाजारातील गुंतवणुकदार देखील या स्टॉकमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देतात.
कंपनीची कामगिरी
टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या MD नी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपला स्थिर रोख प्रवाह साध्य करत आहे. मागील 25-26 वर्षांमध्ये कंपनीने आपले कोणतेही देणे देण्यास विलंब केला नाहीये. रेल्वे मालवाहतूक क्षेत्रातील टिटागड रेल सिस्टिम्स ही कंपनी भारतातील सर्वात मोठी रेल्वे मालवाहतूक करणारी कंपनी आहे.
सध्या या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 28,000 कोटी रुपये आहे. टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीने आपली सध्याची परिचालन क्षमता 600-700 वॅगन्स प्रति महिना वरून वाढवून 1,000 वॅगन प्रति महिना वाढवण्याची योजना आखली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.