2 May 2025 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
x

IT Naukri | आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, या प्रसिद्ध कंपनीने 350 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, हे कारण चिंता वाढवणार

IT Naukri HCL Technologies

IT Naukri | तुम्हीही आयटी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. ‘एचसीएल टेक’ या टेक क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असून, जागतिक पातळीवर मोठी कोस्ट कटिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजने सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासह ग्वाटेमाला आणि फिलिपिन्समधील कर्मचारी या नोकर कपातीमध्ये सहभागी आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर या 350 कर्मचाऱ्यांचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर रोजी असणार आहे.

हा निर्णय का घेतला :
मंदीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज आयटी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्टच्या वृत्ताशी संबंधित प्रोजेक्टवर काम करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. मंदीमुळे कंपनीचे प्रोजेक्ट निघून जातं आहेत.

आयटी क्षेत्रात आणखी चिंता निर्माण होऊ शकते :
जागतिक पातळीवर वाढत्या महागाईची चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात आयटी क्षेत्रासाठी अतिशय कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने टाऊन हॉलच्या बैठकीत या टाळेबंदीची माहिती दिली आहे. सध्या तरी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

आर्थिक दबावाचा सामना करणाऱ्या कंपन्या :
मीडिया रिपोर्टनुसार, एचसीएल टेक्नॉलॉजीज व्यतिरिक्त जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांना आर्थिक दबावाचा सामना करावा लागत आहे. टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या बड्या कंपन्यांसाठीही कंपनीची ही कारवाई चिंतेची बाब आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IT Naukri HCL Technologies lays off 350 employees from company check details 14 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IT Naukri HCL Technologies(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या