
Jai Mata Glass Share | दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात थोड्या फार प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असतात. सोबत तिमाही निकाल, मॅक्रो इव्हेंट्स आणि ग्लोबल ट्रिगरचा प्रभावही शेअर बाजारावर दिसत असतो. अशा काळात शेअर बाजारातील निवडक शेअरवर याचा नकारात्मक परिणाम होतो. परंतु असे काही शेअर्स आहेत ज्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. असाच एक स्मॉलकॅप स्टॉक आहे, ‘जय माता ग्लास’. या कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील 2 महिन्यांपासून दररोज अप्पर सर्किट लागत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)
मल्टीबॅगर परतावा :
स्टॉक एक्सचेंज डेटानुसार, जय माता ग्लास कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 6 महिन्यांत 420 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी जय माता ग्लास कंपनीच्या शेअरची किंमत 0.48 रुपये होती. जय माता ग्लास ही आर्किटेक्चर क्षेत्रात व्यापार करणारी स्मॉल कॅप कंपनी आहे. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 2.67 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
5 वर्षात दिला 7.5 लाख परतावा :
ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी ‘जय माता ग्लास’ कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 7.57 लाख रुपये झाले आहे. कारण या कालावधीत जय माता ग्लास कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 657 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षात या मल्टीबॅगर स्टॉक्सने लोकांना 792.86 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या काळात जय मत ग्लास कंपनीचे शेअर 0.29 रुपयांवरून वाढून 2.50 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अल्पावधीत गुंतवणूकदार मालामाल :
अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या सर्व कालावधीत जय माता ग्लास कंपनीच्या स्टॉकने जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 2023 या नवीन वर्षात जय माता ग्लास कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 117 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यातच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 20.19 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर दुसरीकडे एक महिन्यापुर्वी ज्यां गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधे 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 2.71 लाख रुपये परतावा मिळाला आहे. मागील एका महिन्यात जय माता ग्लास कंपनीच्या शेअरची किंमत 171.74 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.