JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10.1 टक्के वाढीसह 2060.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला 1,390 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचे 7,500 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. जेबीएम ऑटो कंपनीला PM-eBus सेवा योजनेअंतर्गत 1,390 इलेक्ट्रिक बस आणि त्या संबंधित इलेक्ट्रिक इन्फ्रा विकसित करण्याचे काम मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 7,500 कोटी रुपये असेल. ( जेबीएम ऑटो कंपनी अंश )
भारत सरकारने मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये पीएम-ईबस सेवा योजनेची घोषणा केली होती. या योजने अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत देशातील 169 शहरांमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी जेबीएम ऑटो स्टॉक 1.94 टक्के घसरणीसह 1,860 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच जेबीएम ऑटो कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीने JBM Ecolife Mobility Pvt Ltd या उपकंपनीला L1 दर्जा दिला आहे. या कंपनीला PM-eBus सेवा योजनेअंतर्गत 1,390 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी, पुरवठा ऑपरेशन आणि देखभाल आणि नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाचा पुरवठा करण्यासाठी ऑपरेटर म्हणून नेमण्यात आले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 7,500 कोटी रुपये असून त्यांची पूर्तता करण्यासाठी 12-18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मागील 12 महिन्यांत जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअर्सची किंमत 225 टक्के मजबूत झाली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,711.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 105 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, चालू आर्थिक वर्षात जेबीएम ऑटो कंपनी 5,000 कोटी रुपये महसूल संकलित करण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षात जेबीएम ऑटो कंपनी आपल्या बस उत्पादन व्यवसायातून 900 कोटी रुपये महसूल संकलित करुस शकते.
जेबीएम ऑटो कंपनीने ईव्ही बस व्यवसायावर अधिक लक्ष देण्यासाठी एका उपकंपनीची स्थापना केली आहे. या उपकंपनीमध्ये जेबीएम ऑटो कंपनीचे 85 टक्के भाग भांडवल असेल. जेबीएम ऑटो कंपनीने 2024 या वर्षात 1,000-1,500 बसेस वितरित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत जेबीएम ऑटो कंपनीने 700 बसेसचे वितरण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | JBM Auto Share Price NSE Live 20 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRFC Share Price | झपाट्याने वाढलेला रेल्वे शेअर आता सातत्याने घसरतोय, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सवर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत – NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL