 
						JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 221.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 232.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 242.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या प्रमोटर युनिटने जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स खरेदी केल्याची बातमी जाहीर झाल्याने स्टॉकमध्ये उसळी पाहायला मिळत आहे.
स्टॉकवाढीचे कारण
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तक गटाच्या मालकीच्या जामनगर युटिलिटीज अँड पॉवर कंपनीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे 5 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केल्याची बातमी आली आहे. या शेअर्सची खरेदी 208 ते 211 रुपये दरम्यान करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये आलेल्या या ब्लॉक डीलच्या बातमीमुळे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कामोमी सुसाट तेजीत धावत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 278.20 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 205.15 रुपये होती.
भरघोस गुंतवणुकीचे आगमन
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे 3.72 कोटी शेअर्स खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने 25 ऑगस्ट 2023 रोजी खुल्या बाजारातून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे 3.72 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 0.6 टक्के शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने या शेअरची खरेदी 202.8 रुपये प्रति शेअर किमतीवर केली आहे. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 754 कोटी रुपये आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स सेन्सेक्स, निफ्टी आणि इतर प्रमुख निर्देशांकांतून वगळण्यात येतील. या कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी सूचीबद्ध करण्यात आले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		