15 December 2024 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Jhujjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांचा आवडता मल्टीबॅगर स्टॉक, या स्टॉकने 30 महिन्यांत दिला 881 टक्के परतावा

Jhunjhunwala Portfolio

Jhunjhunwala Portfolio | बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ऑटोलाइन इंडस्ट्रीजमध्ये 4.50 टक्के स्टॉक विकत घेऊन गुंतवणूक केली आहे. या मल्टीबॅगर शेअरमध्ये 10 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आणि स्टॉक ने आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी गाठली आहे.

ठळक मुद्दे :
* कोविड काळात ऑटोलाइन इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये प्रचंड पडझड झाली होती.
* मागील पाच ट्रेडिंग सेशन पासून स्टॉक मध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
* अडीच वर्षांत या समभागाने 9.70 ते 85.50 रुपयांपर्यंत मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला हे मल्टीबॅगर स्टॉक ओळखण्यात आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यात मास्टर आहेत. यामुळेच शेअर बाजारातील गुंतवणूकदार नेहमी राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवून असतात. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला ऑटोलाइन इंडस्ट्रीजचा स्टॉकही असा मल्टीबॅगर परतावा देणारा स्टॉक आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये 10 टक्के अपर सर्किट लागला होता. आणि हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे.

या स्टॉकने मागील 30 महिन्यांत तब्बल 881 टक्के इतका कमालीचा परतावा दिला आहे. सोमवारी या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. आणि शेअर 9.97 टक्क्यांच्या वाढीसह दिवसा अखेर 85.50 रुपयांवर बंद झाला. कोविड कालावधीत ऑटोलाइन इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. आणि 27 मार्च 2020 रोजी स्टॉक मध्ये इतकी बेकार पडझड झाली होती की स्टॉक 9.70 रुपयांवर जाऊन पोहोचला होता. पण या स्टॉकने कोविडनंतर च्या काळामध्ये जोरदार पुनरागमन केले आणि जबरदस्त परतावा दिला.

आता पुन्हा तेजीत :
ह्या स्टॉक मध्ये आता पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. ऑटोलाइन इंडस्ट्रीजच्या स्टॉकने अवघ्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांसाठी धमाकेदार कामगिरी केली आणि जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 9.70 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 85.50 रुपयांवर पोहोचला आहे. मागील पाच दिवसामध्ये स्टॉकमध्ये 16 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 40 टक्के टीका कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. महिनाभरापूर्वी स्टॉकची किंमत 60.45 रुपये होती. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये या स्टॉकमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

1 लाख रुपये वर 9 लाख रुपये परतावा :
जर तुम्ही अडीच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमचे पैसे आठ पटीने वाढून 8,81,443 रुपये झाले असते. अशा प्रकारे, या कालावधीत तुम्हाला गुंतवणुकीवर 881 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 2022 च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची गुंतवणूक 1,45,038 रुपये झाली असती.

राकेश झुनझुनवाला यांचा वाटा :
राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ऑटोलाइनच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. जून तिमाहीसाठी कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 10,20,000 शेअर्स म्हणजे कंपनीचा 2.62 टक्के वाटा होता. त्याचवेळी त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे 7,31,233 शेअर्स म्हणजेच 1.88 टक्के शेअर्स इतका वाटा होता. अशा प्रकारे, दोघांची कंपनीत एकूण 4.50 टक्के भागीदारी आहे. ऑटोलाइन इंडस्ट्रीजचा स्टॉक हा लघु बाजार भांडवल श्रेणीतील स्टॉक आहे. आणि त्याचे मार्केट कॅप 333.14 कोटी रुपये आहे. कंपनीच्या बाजार भांडवलाचे प्रमाण 3,53,968 टक्के होते, जे मागील 20 सत्रांसाठी बाजारातील सरासरी प्रमाणाच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jhunjhunwala Portfolio Autoline Industries share price return on 9 August 2022.

हॅशटॅग्स

#Jhunjhunwala Portfolio(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x