 
						Jindal Steel Share Price | जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात अद्भूत कामगिरी केली आहे. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 75 टक्के मजबूत झाले आहेत. 23 ऑगस्ट 2022 रोजी जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 377.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
11 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 700 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 666 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के घसरणीसह 642.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जिंदाल स्टील स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 55.1 अंकावर आहे. यावरून कळते की, हा स्टॉक जास्त विकला गेला नाहीये, किंवा जास्त खरेदी देखील झाला नाहीये. जिंदाल स्टील अँड पॉवर स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.4 आहे, जो खूप उच्च अस्थिरतेचे निर्देशक आहे. जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर मात्र 10 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली व्यवहार करत आहे.
मागील तीन वर्षांत शेअरने किती परतावा दिला
मागील तीन वर्षांत जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 196 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात शेअरची किंमत फक्त 12 टक्के वाढलेली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 67.48 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील पाच वर्षांत शेअरने किती परतावा दिला
मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 229.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने सुरूवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 24,229.67 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 2 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.
तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
तज्ज्ञांच्या मते या स्टॉकवर पुढील रेझिस्टन्स 662.3 रुपये किमतीवर आहे. जर हा स्टॉक रेझिस्टन्सच्या पार गेला तर तो 720 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो. या स्टॉकमध्ये 633 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट आहे. काही तज्ञांनी या स्टॉकवर 825 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तर कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी जिंदाल स्टील स्टॉकवर 740 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		