
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ही कंपनी पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
या कंपनीचे शेअर्स मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. 2023 या वर्षात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक फक्त 8 टक्के वाढला होता. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 1.73 टक्के वाढीसह 364.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय करणाऱ्या ब्लॅकरॉक कंपनीसोबत भागीदारी केली आहे. यासह जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने भारतातील संपत्ती व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी BlackRock सोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने BlackRock सोबत संपत्ती व्यवस्थापन आणि भारतात ब्रोकरेज व्यवसाय सुरू करण्यासाठी 50:50 प्रमाणावर करार केला आहे.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने 1605 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीचा नफा 31 कोटी रुपये होता. 2022-23 मध्ये या कंपनीने 44 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2023-24 मध्ये कंपनीचा महसूल 1,855 कोटी रुपये नोंदवला गेला होता. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी Jio Leasing Services Ltd ही डिव्हाइस लीजिंग व्यवसायात प्रवेश करणार आहे. ही कंपनी टेलिकॉम उपकरणे, ब्रॉडबँड वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि इतर सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.