 
						Jio Finance Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. या काळात आयआयएफएल ब्रोकरेज फर्म आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या शेअर्ससाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज आणि तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह टार्गेट प्राईस दिली आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी हा शेअर 1.36 टक्के घसरून 338.35 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)
आयआयएफएल ब्रोकरेज फर्म – जिओ फायनान्शिअल शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग
आयआयएफएल ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल रिसर्च तज्ज्ञ जयनीत व्होरा यांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. आयआयएफएल ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल रिसर्च तज्ज्ञ जयनीत व्होरा यांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरला ३६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ३३० रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.
स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा – जिओ फायनान्शिअल शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. कुणाल बोथरा यांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 360 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस खरेदी करताना 330 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
जिओ फायनान्शिअल शेअरने 3410% परतावा दिला
मागील ५ या दिवसात हा शेअर 0.85% घसरला आहे. मागील १ महिन्यात जिओ फायनान्शिअल शेअरने 9.06% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 6.26% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 40.66% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 44.25% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये जिओ फायनान्शिअल शेअरने गुंतवणूकदारांना 57.74%% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		