
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शेअर ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश करण्याची योजना जाहीर केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, भारताच्या वित्तीय बाजारपेठेत आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यासाठी कंपनीने ब्लॅकरॉकसोबत एक उपकंपनी स्थापन केली आहे.
नवीन उपकंपनीत दोन्ही कंपन्यांची 50:50 टक्के हिस्सेदारी
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आता जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग नावाची नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग या नावाने संयुक्त उपक्रमाअंतर्गत उपकंपनी स्थापन केली आहे. जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड असं या संयुक्त उपक्रमाअंतर्गत स्थापन केलेल्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने आता वेल्थ मॅनेजमेंट आणि ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश केला आहे. या कंपनीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांची ५०:५० टक्के हिस्सेदारी आहे.
म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास सेबी मान्यता दिली
याशिवाय सेबीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांना ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली होती. जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड उपक्रमांद्वारे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस भारतीय वित्तीय क्षेत्रातील एक प्रमुख खेळाडू बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 5.59 टक्क्यांनी घसरून 260.30 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,65,249 कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 237.10 रुपये होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.