
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 310.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स निफ्टी नेक्स्ट-50 इंडेक्समध्ये सामील होण्याची बातमी आली होती. त्यामुळे हा स्टॉक तेजीत वाढतोय. या निर्देशांकामध्ये शेअर्सचे समायोजन 28 मार्च 2024 रोजी पूर्ण केले जाईल. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 2.32 टक्के घसरणीसह 317.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.97 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 348 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204.65 रुपये होती. नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या व्यतिरिक्त, REC, PFC, IRFC आणि अदानी पॉवर या चार कंपन्याचे शेअर्स देखील निफ्टी नेक्स्ट-50 निर्देशांकावर सूचीबद्ध होणार आहे. हे समावेशन करण्यासाठी काही शेअर्स निर्देशांकातून वगळण्यात आले आहे. त्यामध्ये अदानी विल्मर, मुथूट फायनान्स, पीआय इंडस्ट्रीज, प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ अँड हायजीन केअर यांचा समवेश आहे. या कंपन्यांचे शेअर्स निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांकातून बाहेर पडले आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आणि BlackRock Financial Management यांनी संयुक्तरित्या भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केले होते. डिसेंबर तिमाहीमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने 293 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर 269 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावले आहे. या कंपनीने डिसेंबर तिमाहीत 413 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
मागील 1 महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 32 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.