
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्याच्या वाढीसह 385 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले मार्च तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 6 टक्के वाढीसह 311 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 294 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक 1.83 टक्के वाढीसह 389.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने 418 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा खर्च 99 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर आता मार्च तिमाहीत कंपनीचा खर्च 103 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अनेक पट वाढून 1,605 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने ॲसेट मॅनेजमेंट आणि ब्रोकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपनीसोबत 50:50 भागीदारीत जॉइंट व्हेंचर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ब्लॅकरॉक ही अमेरिकन कंपनी जगातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी मानली जाते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांच्यात संपत्ती व्यवस्थापन कंपनी आणि ब्रोकरेज फर्म स्थापन करण्यासाठी 50:50 भागीदारीमध्ये करार झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.